साधना

Your Spiritual Journey

निळावंती साधना – भाग १ Nilavanti Sadhana Part 1

अनेकांनी निळावंती पुस्तकाच्या बाबतीत माहिती विचारली असली तरी आम्हाला अजून पर्यंत तरी खात्रीलायक पद्धतीने पुस्तक सापडले नाही. काही थोड्याफार कथा सापडल्या त्या सुद्धा विश्वास ठेवण्यासारख्या आहेत असे आम्ही खात्रीलायक पद्धतीने म्हणू शकत नाही. आता मुळांतच भक्ताने हरिचिंतन करावे, गृहस्थ असल्यास गृहस्थ धर्म पालन करावे आणि नसत्या सिद्धींचा नाद लागून घेऊ नये अश्या मताचे आम्ही आहोत.

पण एक बौद्धिक कुतूहल जे आहे ते काही आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. हा ग्रंथ वाचल्याने माणूस वेडा होतो, अकाल मृत्यू येतो, इत्यादी अनेक शंका कुशंका आणि अफवा पसरवल्या जात आहेत. मूळांत जे पुस्तक उपलब्धच नाही त्याच्या कथेवर काय बरे विश्वास ठेवावा ?

पण ह्या पुस्तकाबद्दल मी अनेकांना विचारले होते. ह्या प्रश्नावरून मला तंत्र साधनेत रुची असावी असे कुणाला तरी वाटले. हि व्यक्ती बरीच प्रौढ होती. मी भेटलो तेंव्हा लक्षांत आले कि हि व्यक्ती अत्यंत अध्यात्मिक प्रवृत्तीची होती. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर मी निळावंतीचा विषय काढला. तेंव्हा त्यांनी मला स्पष्टच सांगितले कि निळावंतीचा नाद सोडून द्या. त्यांच्या वडिलांकडून त्यांना आकर्षण मंत्र प्राप्त झाला आहे आणि तोच वापरून त्यांनी मला इथे बोलावले आहे. आणि अचानक माझ्या लक्षांत आले कि ह्या व्यक्तीला ज्याला मी ओळखत सुद्धा नाही अश्या व्यक्तीला भेटायला मी नक्की का आलो आहे ? आणि त्यांच्या आकर्षण मंत्राच्या प्रभावाबद्दल मला थोडीफार खात्री पटली. पण मी त्यांना सांगितले कि अश्या सिद्धीच्या शोधांत मी नाही. मला फक्त एक बौद्धिक कुतूहल म्हणून निळावंती पुस्तकाच्या बद्दल माहिती हवी होती.

निळावंती हे पुस्तक नसून एक प्रकारचे ज्ञान आहे जे आधुनिक जगासाठी नाही. ज्या पद्धतीने वेद इत्यादी हे आधुनिक काळांतीन ज्ञान असले तरी मंत्रशक्तीसाठी वापरले जात नाहीत, किंवा शाबर मंत्र हे कलियुगात वापरले जाऊ शकतात पण तथाकथित निळावंती ज्ञान हे फारच जुन्या काळांतील आणि वेगळ्या मानवांचे ज्ञान आहे. असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांना आधार विचारला तेंव्हा त्यांनी सांगितले कि त्यांच्या वडिलांना अनेक वेळा लोक भूत बाधा निवारण करण्यासाठी बोलावत. बहुतेक वेळा लोकांना फक्त भास किंवा मानसिक आजार होत असे. भूत असे कधी नसेच. पण एकदा सह्याद्रीच्या एका कड्यावर काहीतरी आहे अशी बातमी कुणा भटक्या व्यक्तीने आणली. वडिलांनी ह्यांना सोबत घेतले आणि चांगला ४ दिवस प्रवास करून तो कडा गाठला. तिथे पोचल्यावर म्हणे माझ्या यजमानांना जे त्या काळी १४-१५ वर्षांचे असतील त्यानं सुद्धा काहीतरी शक्तीचे अस्तित्व जाणवले. वडिलांच्या कुठल्याही तांत्रिक क्रियेला कसलाही प्रतिसाद तिथे मिळाला नाही. शेवटी हातोहत्साहित होऊन त्यांनी निघायचे ठरवले तेंव्हा शक्ती स्वतःच एका सावलीचं रूपांत प्रकट झाली. त्या शक्तीने वडिलांशी संभाषण केले पण ती भाषा अगदीच वेगळी होती. त्या शक्तीने म्हणे बाजूचा अनेक मोठा वृक्ष उचलला आणि दणकरून खाली आपटला. ते पाहून दोघेही घाबरले आणि परत आहे. वडिलांनी त्या दिवसापासून तंत्र विद्या सोडून दिली. वडिलांच्या मते सदर शक्ती भूत किंवा पिशाच्च नसून एक अर्वाचीन शक्ती आहे. कदाचित एखादी शापित देवता किंवा यक्ष. त्या शक्तीच्या तोडून जे अनेक शब्द आले त्यांत निळावंती हा एकाच शब्द त्यांना आठवणीत राहिला.

त्या शक्तीचा तोड काय ह्यावर मात्र वडिलांनी काम चालूच ठेवले. काशी, कामाख्या, धर्मस्थळ, वाराणसी, मथुरा, उज्जैन आणि अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि शेवटी त्यांना एक मंत्र मिळाला. माझ्या यजमानांनी वडिलांचे मन बदलविण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी तो मंत्र सिद्ध केलाच. त्या सिध्दीने त्यांना निळावंती ज्ञान प्राप्त होऊ शकले असते. आता ते त्यांना मिळाले कि नाही ठाऊक नाही कारण मंत्र सिद्धीच्या दरम्यान ते मृत्यू पावले.

आता निळावंती वाचल्याने मृत्यू येतो असे म्हणातात हे मी त्यांना सांगितले पण त्यांच्या मते पारा आणि हठयोग ह्यांच्या सोबत ते काही प्रयोग करत होते म्हणून ते मेले असे त्यांनी मला सांगितले.

आता तो मंत्र काय आहे असे मी त्यांना विचारताच हे हसले आणि म्हणाले तीच तर आकर्षण विद्या आहे. हि विद्या वापरून तुम्ही निळावंती ज्याला ठाऊक आहे त्याला आपल्याकडे आकर्षित करू शकता.

मी हा सिद्धी प्रयोग करण्यास साफ नकार दिला पण ज्यांना आवड आहे त्यांच्या साठी आकर्षण मंत्र खाली दिला आहे.

असल्या साधनेच्या आहारी शहाण्याने लागू नये. आधी १००० वेळा महामृत्युंजय मंत्राचा जाप करावाच कारण असली साधना चुकली तर, अकाल मृत्यू, आर्थिक नुकसान, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, प्रेत बाधा इत्यादी होऊ शकते. त्यामुळे महामृत्युंजय मंत्र १००० वेळा जपून सर्वप्रथम आपले रक्षण करावे.

मँत्र: ।।ॐ ठहः ठहः स्वाहा ।।

हा मंत्र सर्वप्रथम १०८ ची माळ घेऊन ११ वेळा जपावा.

इथे व्यक्तीचे किंवा देवतांचे ध्यान करावे जी व्यक्ती किंवा देवता आकृष्ट होऊन आपल्याकडे येईल.

मँत्र: ।।ॐ ठह: ठहः स्वाहा ॐ नमो ॐ नमो भगवतै रुद्राय दृष्टि लापिताहार: स्वाहा दुहाई कसासुर कि दुहाई फुरो मँत्र ईश्वरो वाचा

हा मंत्र ११ * १०८ वेळा जपावा.

आता हा मंत्र तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपेल अश्या पद्धतीने जपावा आणि दर रोज एकाच वेळी जपावा.

मंत्र सिद्ध होण्यासाठी १५-३० दिवस लागतील पण एकदा सिद्ध झाल्यावर देवता, व्यक्ती आपल्याकडे आकृष्ट होऊन येतील.

पुढे काय ? मला ठाऊक नाही कारण मी प्रयोग केला नाही आणि करणार सुद्धा नाही. मी “श्री राम जय राम जय जय राम” म्हणतो. तुम्ही सुद्धा निळावंतीचा नाद सोडून राम नाम घ्यावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *