दत्ताचा पाळणा Dattacha Palana
जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥
कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।
सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥
प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।
हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥
पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।
पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥
षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।
कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥
जो जो जो जो रे मुनिवर्या । स्वामी दत्तात्रया ॥ सांगुनि पूर्वीचा निजपर्या । हालविती अनुसूया ॥धृ॥
असतां निजसदनीं अत्रिमुनी । मागितलें मज पाणी। मुसळ थांबविलें तेचि क्षणीं । ऐकुनि मुनिची वाणी ॥१॥
नारद मुनिनें तें पाहुनि । सांगितलें सुरसदनीं। हरि-हर – ब्रह्मांच्या त्रैपत्नी । क्षोभविल्या अभिमानी ॥२॥
त्यांनी आपुलाले दाटुले । छळणासी धाडिले । त्यांहीं अडवुनिया मज वहिले । भिक्षेसी भागितले ॥३॥
मग म्यां तीर्थातें शिंपिले । तिन्ही बाळे केले । भोजन घालुनिया निजवीले । संवत्सर बहु गेल ॥४॥
उमा सावित्री लक्ष्मी । आल्या आमुच्या धामी । त्यांनी मागितले निजस्वामी । सांडुनि आपुली मी मी ॥५॥
मग म्यां दाखविले देवत्रय । तो तूं दत्तात्रय । निरंजनासि आश्रय । सखया तुझा होय ॥६॥ जो जो ॥