साधना

Your Spiritual Journey

Shri MangalaGourichi Aarati श्रीमंगळागौरीची आरती

Shri MangalaGourichi Aarati
Shri MangalaGourichi Aarati is in Marathi. On every Tuesday in the month of Shravan, newly married ladies pray Goddess MangalaGouri for 5 years to have a happy and peaceful married life.

श्रीमंगळागौरीची आरती
जय देवी मंगळागौरी जय देवी जय देवी ।
ओंवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ।
हिरेया मोती ज्योती । जय देवी जय देवी ॥ धृ ॥
मंगळमूर्ती उपजली कार्या ।
प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।
तिष्ठली राज्यबाळी अहेवपण द्यावया ॥ १ ॥
जय देवी मंगळागौरी जय देवी जय देवी ।
ओंवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ।
हिरेया मोती ज्योती । जय देवी जय देवी ॥
पूजेला ग आणिती । जाईजुईच्या कळ्या ।
सोळा तिकटीं सोळा दुर्वा ।
सोळा परींची पत्री । जाईजुई आबुल्या ।
शेवंती नागचाफे । पारिजातके मनोहरें ।
नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली ॥ २ ॥
जय देवी मंगळागौरी जय देवी जय देवी ।
ओंवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ।
हिरेया मोती ज्योती । जय देवी जय देवी ॥
साळीचे तांदुळ मुगाची डाळ ।
आळणी खिचडी रांधिती नारी ।
आपुल्या पतीलागीं ।
सेवा करिती फार ॥ ३ ॥
जय देवी मंगळागौरी जय देवी जय देवी ।
ओंवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ।
हिरेया मोती ज्योती । जय देवी जय देवी ॥
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती ।
कळावी कांकणें गौरीला शोभती ।
शोभती बाजूबंद । कानीं कापांचे गाभे ।
ल्यायिली अंबा शोभे ॥ ४ ॥
जय देवी मंगळागौरी जय देवी जय देवी ।
ओंवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ।
हिरेया मोती ज्योती । जय देवी जय देवी ॥
न्हाउनी माखुनी मौनीं बैसली ।
पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ।
स्वच्छ बहुत होऊनी अंबा पूजूं लागली ॥ ५ ॥
जय देवी मंगळागौरी जय देवी जय देवी ।
ओंवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ।
हिरेया मोती ज्योती । जय देवी जय देवी ॥
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती ।
मध्यें उजळती कापुराच्या वाती ।
करा धूप दीप आर्ती । नैवेद्य षड्रस पक्वानें ।
ताटी भरा बोनें ॥ ६॥
जय देवी मंगळागौरी जय देवी जय देवी ।
ओंवाळीन सोनियाताटीं ।
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ।
हिरेया मोती ज्योती । जय देवी जय देवी ॥
लवलाहें तिघे काशीसी निघाली ।
माउली मंगळागौर भिजवूं विसरली ।
मागुती परतुनीयां आली ।
अंबा स्वयंभू देखिली । देउळ सोनियाचें ।
खांब हिरेयांचे । कळस मोतियांचा ।
जय देवी मंगळागौरी । ओवाळीन सोनियाताटी ।
जय देवी जय देवी ॥ ७ ॥
Shri MangalaGourichi Aarati
श्रीमंगळागौरीची आरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *