साधना

Your Spiritual Journey

शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा का करू नये ? Why you should not circle a shiva lingam ?

भगवान शिवशंकराची पूजा लिंगरूपात केली जाते. भगवान शिवाने कधीही अवतार घेतला नाही.

शिव हे काळांचा काळ अर्थात महांकाळ आहेत. जीवन मृत्यूचा चक्र त्यांना स्पर्श करू शकत नाही. शिव हे देवांचा देव आहेत. ते एकमात्र परब्रह्म आहेत. त्यामुळेच त्यांची पूजा निराकार रूपात केली जाते. एक प्रकारे या रूपातून समस्त ब्रह्मांडाचीच पूजा होते. कारण ते समस्त जगाचे मूळ कारण आहेत.

भगवान शिवाची पूजा लिंगरूपातच अधिक फलदायी आहे. शिवाचे मूर्तीपूजनही श्रेष्ठ मानले गेले आहे. परंतु लिंगपूजन सर्वश्रेष्ठ आहे. शिवपिंडीला प्रदक्षिणा घालताना जलाधारी अर्थात पिंडीच्या समोर आलेल्या भागापर्यंत येऊन मागे वळावे आणि प्रदक्षिणा पूर्ण करावी. शास्त्रानुसार अशा रीतीनेच शिवलिंगाची प्रदक्षिणा केली पाहिजे.

शिवपुरणानुसार शिवलिंग प्रगट झाले तेव्हा ते अग्निरूपात होते. पृथ्वीवर शिवलिंग स्थापित करायचे कसे हा प्रश्न होता. सर्व देवतांनी देवी पार्वतीला प्रार्थना केली. देवीने आपल्या तपसामर्थ्याने जलाधारी प्रगट केली. पार्वती ही शक्ती रूप आहे. जलाधारीतून शक्ती प्रक्षेपित होत असते. सर्वसामान्य भक्तांनी जलाधारी ओलांडल्यास त्यांना त्या शक्तीमुळे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिवपिंडीची अर्धपरिक्रमाच केली पाहिजे.

संकलन :- सतीश अलोनी

Shiva Lingam represents the male form of the Shiva where as the “jaladhari” the elongated part that extends outward represents Shakti. Shakti brings balance to Shiva.While Shiva is vertical Shakti is horizontal and is critical for its balance. You do not step our shakti because not to disturb that balance.

Shiva lingam is not a murti in a traditional sense. It is a lot more powerful and potent symbol.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *