Monday, October 2, 2023
HomeHindu PeopleAre you sure that British will rule India upto 1960 ?

Are you sure that British will rule India upto 1960 ?

वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची… कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त!

आणि हा माणूस कोर्टात म्हणतो, “Are you sure that British will rule India upto 1960 ?”
कसं काय माणूस म्हणायचं ह्याला…

तिकडे फ्रांस सरकार हैराण, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेला ते प्रकरण निस्तरताना…

सगळ्यांनी “असं कसं झालं? आपल्या जमिनीवरून इंग्रजांनी माणूस नेलाच कसा?” असं विचारून बेजार केलेलं…

फ्रांस सरकारने ते प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेलं. तिथल्या निर्णयानुसार सगळ्यांसमोर, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी, जाहीररीत्या, उभं राहून माफी मागितली.

बरं माफी ठीक आहे, पण प्रकरण पूर्ण मिटवण्यासाठी फ्रांस ने विचार केला, कदाचित हा माणूस, काळ्या पाण्याची शिक्षा झालेला, परत समुद्रात उडी मारेल आणि आपण त्याला वाचवू. म्हणून स्वखर्चाने, आपल्या Defense Ministry मधली एक पाणबुडी, भारतापासून पार अंदमान पर्यंत या कैद्यांच्या बोटीमागून नेली.
पण तसं काही झालं नाही. कैदी अंदमानला पोचले. शिक्षा सुरु झाली.

नारळाच्या काथ्या कुटायच्या, दोर वळायचा. नंतर ८ तास लोखंडाचा “कोलू” फिरवायचा.
हा माणूस, हे सगळं झाल्यावर, संध्याकाळी कैद्यांचे साक्षरता वर्ग घ्यायचा.

नंतर तुरुंगात परत गेल्यावर भिंतींवर कविता लिहून काढायच्या. “मर्मबंधातली ठेव हि” हे नाट्यगीत तुरुंगात सुचले त्यांना. तुरुंगातल्या आठवणी म्हणजे ह्यांच्यासाठी मर्मबंधातली ठेव!

काय पण माणूस…
कैद्यांना घरातून मिठाई ऐवजी पुस्तके आणायला सांगितली आणि Library सुरु केली, तुरुंगात.
मुसलमान कैदी हिंदूंना बाटवायचे, तो प्रकार त्यांनी बंद केला. (म्हणून पुढे अंदमानहि पुढे पाकिस्तान व्ह्यायचा वाचला, कदाचित!)

या सगळ्या प्रकारांनी जेलर जाम वैतागला. कोणीही नियमाविरुद्ध वागत नाही म्हणून कारवाईही करता येत नव्हती. मग त्याने एक माणूस बोलावला, डांबर घेऊन. तुरुंगातल्या कविता लिहिलेल्या भिंती डांबराने रंगवून टाकल्या.

आता हा माणूस कविता पुसल्या म्हणून आपल्यावर हात उगारेल आणि मग आपण त्याला ठोकून काढू अश्या आनंदात जेलर होता. तर आमचे कवी, “Thank You” म्हणत Shake-hand करायला पुढे!

“अहो, त्या भिंतीवर लिहिलेल्या कविता पाठ झाल्या होत्या, दुस-या लिहायला जागा शिल्लक नव्हती. तुम्ही भिंती रंगवून भरपूर जागा केली.”

असो… तर तिकडे मनासारखं काम झाल्यावर सरकारला पत्र लिहिलं “मी काही राजकारणात पडणार नाही. मला माफ करा. पण इथून सुटका करा.”
सरकारने ह्यावर विश्वास ठेवला. कैद्याला भारतात परत आणला, पण स्थानबद्धतेत ठेवलं, रत्नागिरीत!
रत्नागिरीत जातीभेद निर्मुलनासारखी राजकारणाशी (Directly) संबंधित नसलेली, समाजोपयोगी कामं, विरोध पत्करून करून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर सक्रीय राजकारणात पडून सरकारचा विश्वासघात केला.

(जातीभेद कमी करण्यासाठी पतितपावन मंदिर उभारलं, तिथली पहिली पूजा, भंग्याच्या हातून करवली, गाभा-यात जाऊन!)

सरळ-सरळ विश्वासघात.. पर्याय नव्हता, Plan पूर्वीच ठरला होता… माफीपत्र काय उगीच दिलं नव्हतं…

हा माणूस हे सगळं करत असताना त्यांचे कुटुंबीय काय करत होते? लपून होते? शोक करत होते? अजिब्बात नाही…

इंग्लंड मधून स्वयंपाकाच्या सामानाच्या नावाखाली निघालेले बाँब नाशकात आले आणि अचानक, हो अचानकच, त्यांची वाहिनी आणि बायको यांना दिवस गेले, खोटं नाही, नाशिक पोलिसांचा Report आहे तसा.

हं, मग ह्या दोघी delivery साठी सुरत, गुजरात ला निघाल्या… आगगाडीने. गुजरात मध्ये बंगालच्या कोणीतरी दोघी आल्या होत्या. ह्या दोघींनी, त्या दोघींना, आपले दिवस deliver केले आणि नाशकात परत आल्या. नाशिक पोलिसांचा report आहे, बाँब कसे transfer झाले यावरच्या सफाईचा. त्यांनी स्पष्ट म्हटले आहे, “देवकीची मुलं यशोदेकडे जातात”. बरं, गरोदर बाईची झडती घ्यायची परवानगी नाही, पोलीस काय करणार…

वाचताना गम्मत वाटेल पण त्या दोघींनी आपापल्या पोटावर, साडीच्या आतून, बाँब बांधून नेले होते, आगगाडीतून, चेष्टा नव्हे!!! आपण फक्त कल्पना करायची…

हे अख्ख कुटुंबच वेगळं होतं.
ह्या कुटुंबाला सरकारने काय दिलं? मोठ्या भावाला २५ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा दिली, लहान भावाला अटक केली, ह्यांना अटकेचे वॉरंट (ते कान्हेरेनी पिस्तुल वापरलं, हां, ते.). सगळं घर, जमीन, शेती, भांडी सुद्धा जप्त केली. सगळी bank accounts seal केली आणि वर वाहिनी आणि बायको ह्यांना कुणीही घरात घ्यायचे नाही, घेतल्यास घरावरून गाढवाचा नांगर फिरवू, घर पाडू अशी ऑर्डर…

५-६ वर्ष ह्या दोघी, माहेरी, गुरांच्या गोठ्यात राहत होत्या.

हे सरकार भारताविरुद्धच होतं, पण गम्मत ऐकून ठेवा.
आपल्या सरकारने, भारत सरकारने, आजतागायत ती property त्यांच्या वंशजांच्या ताब्यात दिलेली नाही…

त्यांचं नशीबच वेगळं होतं. इंग्रज सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन तुरुंगात टाकलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा, भारत सरकारने, कोंग्रेस सरकारने, गांधी-वधाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं…

(रत्नागिरीत तुरुंगात ठेवले असताना त्यांना ज्या हातकड्या घातल्या होत्या त्या अक्षरशः आपण उचलूही शकत नाही… )

पुराव्या अभावी निर्दोष सुटले ते, सुटणारच होते. नथुरामला ह्यांनी कटात मदत करण्याची काय गरज होती? तो नथुरामच्या बुद्धीचा अपमान आहे.
तर, स्वातंत्र्यानंतरही, स्वातंत्र्यासाठी लढणा-या, आयुष्य वेचणा-या या मनुष्याला तुरुंगवास भोगावा लागला…

त्यांच्या बलिदानबद्दल मराठी शालेय पुस्तकांत थोड़ी माहिती आहे, इंग्रजी माध्यमांत तर नाहीच.
देशाचं आणि नविन पिढीचं दुर्दैव, दुसरं काय?

अखंड भारत अंगण व्हावे !
राष्ट्र ध्व्जासह निशाण भगवे!
हिंदुत्वा तू अमर करावे !
हेच मागणे आता….
विनायका घे पुनर्जन्म आता !!!!

कुशाग्र बुद्धिमत्ता, इतिहास, राजकारणाचा गाढा अभ्यास-व्यासंग, द्रष्ठेपणा, मुत्सद्दिपणा, तेजस्विता, अचाट असा बौद्दिक व शारीरिक पराक्रम, अजोड असे प्रभावी वक्तृत्व, अभ्यासू संभाषण कुशलता, व्यासंगी लेखकत्व, असीम त्याग, अतुलनीय धैर्य, निष्काम स्थितप्रज्ञता, तत्वचिंतक कर्मयोगी, महाकवी, आत्मविश्वासुवृत्ती यांचा सुरेख संगम म्हणजे तात्याराव उर्फ विनायक दामोदर सावरकर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

C G Suprasanna on Vijayraghav Mandir, Ayodhya
Peddinti Devaraju on Nilavanti : The book of Mysteries
Premswarup yadav on Nilavanti : The book of Mysteries
P.chandrasekaran on Hindu temples in Switzerland
Muhamad on Soma
Muhamad on Soma
muhamadsofyansanusi28@gmail.com on Soma
Pankajkumar Shinde on Nilavanti : The book of Mysteries
Ashwath shah on Mahabharat- Story or Truth
Shubhra lokhandr on Nilavanti : The book of Mysteries
Aditya Sharma on Mahabharat- Story or Truth
Aditya Sharma on Mahabharat- Story or Truth
prachi chhagan patil on Nilavanti : The book of Mysteries
Prateek the vedantist on Shivleelamrut 11 Adhyay
Prateek the vedantist on Shivleelamrut 11 Adhyay
Voluma on Brihaspati
Vinayak anil lohar on Sirsangi Kalika Temple
Skip to toolbar