येळकोट अर्थ – Meaning of Yelkot
येळकोट ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय हा प्रश्न खंडोबाच्या भक्तांना नेहमीच पडत आला आहे.
खंडोबाला प्रिय असणारा हा पदार्थ त्या टाकावर उधळताना मनामनातून आवाज घुमत असतो, ‘ येळकोट-येळकोट-जय मल्हार !’ महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचे आणि पंथांचे, रावांचे आणि रंकांचे कुलदैवत खंडोबा आणि तो म्हणूनच खऱ्या अर्थाने आहे लोकदेव. मुळ कर्नाटकातला ‘ खंडोबा ‘ मूळ कर्नाटकातले. नंतर तो महाराष्ट्रात आला; पण हा येळकोट हणजे कोन ? ‘ येळू ‘ या कानडी शब्दचा अर्थ म्हणजे ‘ सात ‘ असून कोट म्हणजे ‘ कोटी. ‘ सात कोटी असा या शब्दाचा अर्थ. मल्हारी मार्तंडाचे सैन्य सात कोटी होते, यावरून त्याला ‘ येळकोट मल्हार ‘ संबोधिले जाऊ लागले. ‘इला’ म्हणजे ‘पृथ्वी’ आणि ‘कोट’ म्हणजे ‘पूर्णपात्र’. “खंडेराया, शेतात भरपूर धान्य पिकू दे ! मी तुला पूर्णपात्र भारेऊन ते अर्पण करीन” असाही येळकोट शब्दाचा अर्थ लावला जातो. दैत्याचा निर्दालन करणारा मल्लहारी :- ‘मैलार’ हा ‘मल्लारी’ शब्दाचा अपभ्रंश असून ‘मणी’ आमी ‘मल्ल’ ता दोन राक्षसाना मारणारा तो ‘मल्लहारी’ म्हणजे ‘मल्लारी’ किंवा ‘मल्लांना (दैत्यांना) मारणारा’ असा त्याचा अर्थ आहे. ‘चांगभले’ हा शब्दही कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. ‘चांगले,भले’ अश्या अर्थाचा हा मराठीत आलेला आहे. कानडीत ‘सांगू भलो’ अशा प्रकारे हा घोष करतात. या दैवताची ‘ मल्लारी मार्तंड’, ‘खंडोबा’, ‘खंडेराय’, ‘म्हाळसाकांत’, ‘मार्तंड भैरव’ इतकेच नव्हे, तर ‘मल्लुखान’, ‘अजमखान’ अशीहि नावे आहेत. ‘मणी’ आणि ‘मल्ल’ या दैत्यानाचा नयनात भगवान शंकरांनी मार्तंडाचा अवतार घेऊन केला. त्या अवतारात शंकरांनी जे खड्ग वापरले होते त्याचे नाव होते ‘खांडा’ आणि म्हणूनच तो खांडा धारण करणारा ‘खंडोबा.’
Khandoba is a God from Karnataka. It arrived to Maharashtra later. Yelu is a word in Kannada which means 7. Kot means crore or types. Malhar Martand King had 7 crore soldiers. This very likely means 7 regiments or 7 types of soldiers. Yelkot Yelkot Jai Malhar is the slogan of the army. We have 7 crore soliders, victory to Malhar basically is a great slogan which has become a battle cry of all Khandoba worshippers.
we used to chant during ugadi festival in our home