ईस्ट इंडिया कंपनी
अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तान भागांत जी युद्धे चालवली आहेत त्याचा अंत अजून तरी दृष्टिक्षेपाला येत नाही. त्याशिवाय सीरिया आणि येमेन इथे अजूनही अमेरिकेचे सैन्य कार्यरत आहे. चारी ठिकाणी मिळून अब्जावधी डॉलर्स चा चुराडा दार वर्षी होत आहे. इराक युद्धांत अमेरिकेने सुमारे २ ट्रिलियन डॉलर्स उडवले आहेत आणि युद्धाचा एकूण खर्च (जखमी सैनिकांचे पेन्शन, बॉण्ड्स वरील इंटरेस्ट इत्यादी ) मिळून तो सुमारे ६ ट्रिलियन डॉलर होईल. काही दिवस आधी अमेरिकन सैन्याने ९६ मिसाईल्स सीरिया मध्ये वापरली ह्यांचा एकूण खर्च १०० मिलियन इतका होता. हा फक्त मिसाईल्स चा खर्च. अफगणिस्तानात कोट्यवधी दारुगोळा अमेरिकेने नेला नंतर माघार घेताना वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने ३ मिलियन डॉलर्स वापरून सुमारे ८० मिलियन डॉलर्स चे अँम्युनिशन नष्ट केले. त्याच वेळी अफगाणिस्तानात क्रिकेट चा प्रसार करण्यासाठी अमेरिकेने २० मिलियन्स डॉलर्स खर्च करून अफगाणी क्रिकेट चे लाईव्ह टेलिकास्ट केले पण अफगाणी लोकांकड़े टीव्हीच नसल्याने ते कुणी जास्त लोक पाहू शकले नाहीत.
इथे अमेरिकन करदात्यांचे पैसे कसे उडवले गेले हे सांगण्याचा हेतू नाही तर हा पैश्यांचा गैरवापर नक्की कसा होतो आणि भारतीय पारतंत्र्य ह्या विषयाचा कसा संबंध आहे हे सांगणे आहे.
अमेरिकन युद्धानी अनेक अमेरिकन कंपन्यांचा फायदा होतो. अमेरिकन राजकारणी मंडळींनी आधीपासून ह्या विविध कंपन्यात सरळ नाहीतर इतर मार्गानी गुंतवणूक केली आहे. निवृत्तीनंतर अनेक कंपन्या राजकारणी आणि बाबू मंडळींना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देतात. नाही तर त्यांच्या मुलांना मोठ्या नोकऱ्या देतात. मग हेच राजकारणी मंडळी उगाच “अमेरिका खतरे में” आवई उठवतात आणि शहनाईच्या मागे पों वाजते त्या प्रमाणे इतर “एक्स्पर्ट” मंडळी सुद्धा तोच सूर धरतात. ह्या एक्स्पर्ट मंडळींना विविध विश्वविद्यालयांत tenure देण्याची जबाबदारी मग विविध लॉबिस्ट ग्रुप उठवतात. ट्रम्प आणि NYT ह्यांत विस्तव जात नसला तरी सीरिया मध्ये मिसाईल ऍटेक चे पुरेपूर समर्थन NYT ने केले होते.
इथे तीन वेगळे मत प्रवाह उभे राहतात :
– इतर जग, भारतीय , naive लोग : अमेरिका हि युद्धे तेल चोरण्यासाठी करत आहे.
– अमेरिकन राजकारणी : अमेरिकेला धोका आहे म्हणून आम्ही युद्ध लढत आहोत
– (काही) अमेरिकन जनता : आमचे पदराचे पैसे मोडून मुळी इराक अफगाणिस्तानात इतका वेळ रहावेच का ? हाच पैसा आपल्या देशांत गुंतवावा.
– अमेरिकन डिफेन्स कंपनी executive : लोक मरोत आमचा स्टॉक वाढत आहे ना मग झाले .
इतिहास लिहत असताना अनेक लोकांना ह्या विचार प्रवाहांचा विसर पडतो. अनेक वर्षे जातात आणि फक्त काहीच मते लोकांच्या आठवणीत राहतात.
ईस्ट इंडिया कंपनी आणि भारत
इतिहास शिकताना किंवा एखादा चित्रपट वगैरे बघताना असे दाखवले जाते कि सर्व ब्रिटिश एकसंध होऊन भारताच्या विरोधांत होते. चुकून एकदा ब्रिटिश भारताची बाजू उचलून धरत आहे. पण भारतीय कॉलोनी आणि त्यावरील तत्कालीन विविध ब्रिटिश राजकारणी आणि विचारवंत ह्यांचा विचार काय होता ? ज्या प्रमाणे अमेरिकन युद्धांचे आर्थिक परिणाम अभ्यासले जातात त्याप्रमाणे ब्रिटिश आणि इस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक विश्लेषण कितपत केले जात होते ?
७व्या शतका पासून अरब आणि व्हेनिस वाले व्यापारी भारत आणि चीन मधून सामान आणून युरोप मध्ये विकायचे. तेंव्हापासून भारतीय माल युरोप मध्ये अतिशय लोकप्रिय होता. ह्यामुळे अरब आणि व्हेनिस अतिशय गब्बर झाले होते त्याच वेळी इतर युरोपिअन राष्ट्रे भारतांत जाण्यासाठी इतर मार्ग शोधू लागली. गुजराती व्यापारी अरब प्रदेशांतून वारंवार युरोप भागांत जायचे. नंतर पोर्तुगजीस लोकांनी जेंव्हा भारताचा सागरी मार्ग शोधला तेंव्हा सर्वच युरोपिअन राज्ये भारतात आपल्या कंपन्यांना पाठवू लागली.
१५०० नंतर अमेरिकेतून युरोप मध्ये सोने आणि चांदी येऊ लागली. इंग्लंड मध्येच अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी जहाज बांधायला घेतली. अमेरिकेतून सोने आणायचे आणि ते सोने भारतात नेवून भारतातून वस्त्रे, मसाले इत्यादी विकत घ्यायचे असा व्यापार सुरु झाला. ह्या व्यापारांत इतका प्रचंड फायदा होता कि अक्षरशः हजारो जहाजे बांधली जाऊ लागली. मग काही मोठ्या कंपन्यांनी छोट्या कंपन्यांचा धंदा ह्या ना त्या मार्गाने बुडवण्याचा सत्र आरंभले. अजून पर्यंत अनेक ग्राहक असल्याने भारतीयांचा फायदाच होत होता. ग्राहक जास्त असले कि त्यामुळे स्पर्धा वाढते त्यामुळे आपल्या मालाला जास्त दर मिळतो आणि त्यामुळे आधुनिक पद्धतीने कपडे करणे, शेती करणे ह्यांत भारतीय लक्ष घालू लागले (आधुनिक शेती आणि भारत हे दोन्ही शब्द एकाच वाक्यात वापराने आज हास्यास्पद वाटते पण अनिर्बंध एक्स्पोर्ट मुळे भारतीय शेतकऱ्यांची अक्षरशः चांदीच होत होती) .
आता भारतात ज्या प्रमाणे अदानी किंवा अंबानी दिल्लीतील तक्थ हलवू शकतात त्याच प्रमाणे अनेक व्यापारी इंग्रजी राजघराण्याला वेठीस धरत होते. त्याशिवाय स्पेन, पोर्तुगिज, फ्रांस, डेन्मार्क इत्यादी राज्ये इंग्रजांच्या नाकांत दम करत होती ते वेगळे. सर्वप्रथम युरोपिअन राज्यांनी समुद्रांत आपले साम्राज्य स्थापन केले. ते एकमेकांत भांडत असले तर भारत, चीन इत्यादींच्या जहाजांना ते “चाचे” म्हणून एकजुटीने मारत असत. पायरेट्स ऑफ कॅरिबयन चित्रपटांत कान्होजी आंग्रे ह्यांचा मुलगा संभाजी आंग्रे हा चाचा म्हणून दाखविला गेला आहे.
पण युरोपिअन देशानी जहाज बांधणीत भरारी घेतलीच कशी ? त्याचे कारण राजघराणी आणि चर्च ह्यांत आहे.
आधी राजाला जर दोन मुले असायची तर राजा आपले राज्य वाटून दोघांना द्यायचा. एक दोन मुले झाली कि राणीला विटून राजा मग जास्त तरुण कोवळ्या मुलींच्या सानिध्यांत रमायचा आणि अनेक बास्टर्ड मुले निर्माण करायचा. ह्यावर चर्च मंडळींनी आक्षेप घेतला. मग राजाला नाईलाजाने बायकोबरोबर जास्त वेळ घालवावा लागला. मग तिला जास्त मुले झाली. आता राज्य ५ भागांत वाटले गेले तर पाचही मुलांची पवार कमी होते म्हणून चर्चला हाताशी धरून राजे मंडळींनी नियम बदलले. आत फक्त मोठा मुलगा राजा व्हायचा. चर्च ने एकूणच राजाचे लग्न , त्याचे लैगिक जीवन ह्यांत हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती. मुलांत राजाने सेक्स करूच नये ह्यावर त्यांचा भर असायचा कारण एकदा राजाला मूल नाही झाले तर उत्तराधिकारी ठेवायची जबाबदारी चर्च वर यायची. १४०० मध्ये राजा राणीला सेक्स करायला चर्च नियमा प्रमाणे साधारण २० दिवस मिळायचे.
आता मग वेगळी समस्या निर्माण झाली. मधले आणि धाकटे पुत्र मोठ्या भावाला मारण्यासाठी षडयंत्र लहानपणा पासूनच रचू लागले. मग काही बिशप मंडळी लहान असतानाच मुलाला हेरून त्याला आपल्या मोठ्या भावाला मारण्यात मदत करायची त्यामुळे बिशप मंडळीत सुद्धा भांडण लागून चर्च आणि पोप ला त्याचा त्रास व्हायला लागला.
म्हणून विविध राजांनी नवीन स्कीम काढली. मोठा मुलगा सोडून इतर सर्व मुलां वयांत येतंच प्रचंड पैसा द्यायचा आणि त्या बदल्यांत त्यांनी सर्व हक्क त्यागून देश सोडून द्यायचे. मग काही चतुर entrepreneur मंडळींनी शिपिंग कंपन्या स्थापन केल्या. एका राजकुमाराला पैसे मिळताच तो पैसा ह्या कंपन्यांना द्यायचा, त्या कंपन्या मग वास्को गामा सारखे नराधम शोधून त्यांना गुलाम वगैरे देऊन नवीन जमीन शोधायला पाठवायचे. एकदा जमीन सापडली अव्वाच्या सव्वा डाँ ह्या राजकुमाराला मिळायचा आणि पाहिजे तर मग त्याला त्या भागाचा शासक म्हणून अनिर्बंध सत्ता मिळायची.
ह्या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे युरोपमध्ये जहाज बांधणी व्यवसाय भरभराटीला आला. आपण इंग्लंड मध्ये गेलात तर एखाद्या जहाज संग्रहालयांत जा आणि जुन्या काळाची जहाजे किती थक्क करणारी होती हे आपण पाहू शकाल. विविध प्रकारचे सामान नेण्यासाठी विविध प्रकारची आणि आकाराची जहाजे. शिडांचा कपडा पासून हगंदारी पर्यंत प्रत्येक गोष्टीत विविधता आपल्याला दिसून येईल.
हळू हळू युरोपिअन देशांची मक्तेदार एकट्या इंग्लंडने मोडून काढली. ह्यांत हेन्री आठवा ह्याचा मोठा हाथ आहे. १५०० मध्ये ह्याचा घटस्फोट करून द्यायला रोमन चर्च ने नकार दिला. हेन्री हा क्रूरात्मा होता असे इतिहास सांगतो पण चर्च साठी तोच वस्ताद होता. त्याने कॅथॉलिक चर्चलाच झुगारले आणि स्वतःची चर्च स्थापन केली. कॅथॉलिक लोकांना त्याने हाकलले, त्यांची संपत्ती जप्त केली. इत्यादी. पुढील शतकांत चर्च ची लुडबुड नसल्याने ब्रिटिश राजसत्तेला जास्त स्वातंत्र्य होते त्याच्या उलट पोर्तुगीस इत्यादी धर्मांध बनले आणि तिथेच त्यांचा ह्रास झाला.
ईस्ट इंडिया कंपनी चा उदय
१६९० आधी फक्त ब्रिटिश पार्लमेंट कडून परमिशन घेऊन ब्रिटिश कंपन्या भारत व्यवहार करू शकत असत. त्यात ईस्ट इंडिया कंपनी पुढे होती.
१६९० मध्ये कुणीही ब्रिटिश व्यापारी भारतात आपले जहाज पाठवू शकत होता. ब्रिटिश नेव्ही त्यांचे फ्रांस इत्यादी पासून रक्षण करायची. अश्यांत दुसऱ्या ईस्ट इंडिया कंपनी चा उदय झाला आणि ती चांगला नफा कमावू लागली. दोन्ही कंपन्या मध्ये तीव्र स्पर्धा असल्याने ब्रिटिश राजकारणी सुद्धा कुना एकाची बाजू घेऊन भांडत असत.
काही वर्षांनी दोन्ही कंपनी आणि ब्रिटिश राजकारणी एकत्र आले आणि त्यांनी दोन्ही कंपन्या मर्ज करण्याचा निर्णय घेतला त्याच बरोबर इतर सर्व कंपन्यांना भारतात व्यवहार करण्याला बंदी घातली गेली. मग ब्रिटिश राजकारण्यांनी ह्या कंपनीचे भाग विकत घेतले आणि ते सर्वांत मोठे गुंतवणूकदार बनले. पुढे कंपनीच्या डिरेक्टकरच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून त्या कमिटीला कामपणीच्या व्यवहारावर नजर ठेवायला सांगितले गेले.
ब्रिटिश जनता आणि ईस्ट इंडिया कंपनी
आधी आधी कंपनी फक्त व्यापार करत असे. मोनोपोली असल्याने वाट्टेल तो दर लावून ब्रिटिश लोकांकडून पैसे उकळावयाचे आणि नफा राजकारणी मंडळींनी वाटून घ्यायचा असे सत्र सुरु झाले. १७७० पर्यंत कंपनीने आणि राज्यकर्त्यांनी बक्कळ पैसा कमवला. कोलकाता इत्यादी ठिकाणी त्यांची ठाणी होती. १७७० नंतर अमेरिकेने ब्रिटिश राज्यसत्तेला चांगलाच बांबू दिला. तेथून पैसे येणे बंद झाल्यावर ब्रिटिश राज्यकर्त्यांना पैश्यांची चणचण भासू लागली आणि ईस्ट इंडिया कंपनीवरील दबाव वाढला.
इथे कंपनीने सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला मारायचे ठरवले. जबरदस्तीने भारतीय लोकांकडून जमीन, धान्य काढून घ्यायचे, संपत्ती लुटायची असे करून शॉर्ट टर्म मध्ये जास्त पैसे कमवायचा पण त्याच वेळी लॉन्ग टर्म मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडायचे असे सत्र आरंभले. त्यातूनच बंगालचा दुष्काळ भारतीयांसाठी प्रचंड जीवघेणा ठरला.
भारतीय राजे काही एकदमच मूर्ख नव्हते. व्यापारी ईस्ट इंडिया कंपनी विनाकारण भारतीयांचा छळ करते आहे हे लक्षांत येतंच त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी ला लगाम लावायचा प्रयत्न केला अश्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीला कळून चुकले कि आणखीन चोरी करायची असेल तर भारतावर राजकीय नियंत्रण सुद्धा मिळवणे आवश्यक आहे. हे नियंत्रण मिळविण्यासाठी कंपनीला अनेक बेकायदेशीर गोष्टी कराव्या लागल्या. लहान मुलांना मारणे, लोकांचे हाथ छाटणे, जिवंत जाळणे, डाकू लोकां बरोबर संगनमत करणे, बाकी थकवणे, इतर राजा बरोबर असलेला करार मोडणे इत्यादी.
ह्या सगळ्याकडे ब्रिटिश पार्लमेंट कानाडोळा करायची.
ऍडम स्मिथ
ऍडम स्मिथ, डेविड ह्यूम इत्यादी स्कॉटिश enlightenment चे मुख्य विचारवंत होते. वैयक्तिक स्वातंत्र्य, फ्री ट्रेड, भांडवलशाही इत्यादी विषयावर ऍडम स्मिथ ला जनक मानले जाते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना scandal म्हणून कडाडून विरोध केला. अश्या प्रकारच्या मोनोपोलीने ईस्ट इंडिया कंपनीला माज चढेल असे त्यांचे मत होते त्या शिवाय ब्रिटिश जनतेचे ह्यांत किती नुकसान आहे हे त्याने दाखवून दिले. “An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations” (1776) ह्या पुस्तकांत त्यांनी जे काही लिहिले ते आज सुद्धा अर्थशास्त्रांत शिकवले जाते आणि त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.
Adam Smith highlighted the government-granted monopoly of the EIC and its abuses and inefficiencies. He argued that the Bengal drought was turned into a famine due to the EIC’s incompetence.
भारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणा पेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
ब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तयारीस सुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्दा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला मिळायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कामपणीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धानी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळे. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती.
१८५७ च्या बंड उंटांचे कंबरडे मोडणारी शेवटची काठी ठरली. ज्या निर्र्लज्जतेने इंदिरा गांधी ह्यांनी खाजगी बँक गिळंकृत केल्या त्याच निर्ल्लजतेने ब्रिटिश सरकारने कंपनीचा ताबा घेतलाच पण वरून सर्व भागीदाराकनं डिव्हिडंड आणि मोबदला दिला. खरे तर इथे कंपनी पूर्णपणे दिवाळखोर ठरायला पाहिजे होती पण ब्रिटिश करदात्यांचा पैसा वापरून ब्रिटिश लॉर्ड्स मंडळी आणखीन एकदा गब्बर झाली.
१८५७ नंतर ब्रिटिश सरकारने भारताचा ताबा ठेवण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला. ह्यामुळे ब्रिटिश जनतेचा काडीचाही फायदा झाला नाही उलट नुकसान जास्त झाले.
ज्या पद्धतीने अमेरिकेच्या इराक युद्धातून बुश, हिलरी, ओबामा, लोकहिड मार्टिन, बोईंग, इत्यादींचा फायदा झाला पण जनतेचे नुकसान झाले त्याच प्रमाणे १८५७ नंतर ब्रिटिश जनतेचा प्रचंड पैसा भारतांत रस्ते, रेल्वे, न्यायालये, निकृष्ट दर्जाची विद्यालये, आर्मी कॅंटोन्मेंट, बर्राक्स इत्यादीत खर्च झाला तर ईस्ट इंडिया कंपनीच्या काळांत सारखे लोक अतिशय गब्बर झाले. थॉमस पिट सारखेच लोक ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने भारतांत आले पण नंतर फरार झाले आणि बाहेरून गुपचूप पाने भारतीय माल युरोप मध्ये स्मगलिंग करून गब्बर झाले.
ईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDP च्या २% इतका होता. म्हणजे त्या दृशीतकोणातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंड साठी इतकी महत्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणा साठी खर्च होत होता. आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता.
ब्रिटिश सरकारचे नुकसान
६० पेक्षा जास्त हिल स्टेशन्स, १०० पेक्षा जास्त कॅंटोन्मेंट, ३ महाभयंकर पैसे खर्च करून केलेले दिल्ली दरबार, ७०,००० ब्रिटिश नोकरदारांचे पगार ह्यावर ब्रिटिश जनतेचा प्रचंड पैसा जात होता. काही लोक म्हणतात कि ब्रिटिश सरकारने ह्या बदल्यांत भारतातून प्रचंड पैसा चोरून नेला पण त्यांत तथ्य नाही कारण ब्रिटिश सरकार शेवटी पैसे देऊनच धान्य विकत घेत असे, पैसे देऊनच वस्त्रे , कोळसा इत्यादी विकत घेत असे आणि जो माल चोरून विकला जायचा त्याचे पैसे ब्रिटिश सरकार किंवा जनते ऐवजी ब्रिटिश काही थोड्याच लोकांच्या हातांत जात असे.
ह्याउलट समजा ब्रिटिश लोकांनी काढता पाय घेतला असता आणि त्यावेळच्या राज्याकडे फ्री ट्रेड करार केला असता तर भारतीय लोकांनी आनंदाने आपले सामान ब्रिटिश किंवा इतर कुणालाही विकले असतेच. ह्या उलट ब्रिटिश सरकारचा सरकारी यंत्रणेवरील खर्च वाचला असता आणि स्वतः सुरक्षित असल्याने भारतीय शेतकरी आणि उद्योगधंद्यांत जास्त गुंतवणूक होऊन भारताने सुद्धा अधिक प्रगती केली असती.
ऍडम स्मिथ ह्यांनी हे त्या काली ओळखले होते आणि शेवटी जेंव्हा काढता पाय घ्यायची वेळ आली तेंव्हा ऍडम स्मितच्याच विचारांचा प्रभाव लोकांच्या मनावर पडला होता.
One Historian, writing in the new Oxford History of the British Empire has gone so far to speculate that if Britain had got rid of the Empire in the mid 1840s, she could have reaped a ‘decolonization dividend’ in the form of a 25% tax cut that could have been diverted to industrial modernization at home.
मिल्टन फ्रीडमन ह्यांच्या अंदाजानुसार भारतीय लोकांना गुलाम ठेवून ब्रिटिश राजसत्तेचे नुकसानच जास्त झाले.
भारतीयांचे नुकसान
पण गुलामगिरीच्या काळांत सर्वांत मोठे नुकसान भारतीय लोकांचे झाले. आधी ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश राजघराणे ह्यांनी भारताला आपली पुनः बटीक बनवले. लावणीत बाजूला नाच्या जसा नाचतो त्या प्रमाणे बाजूला नेहरू, पटेल, गांधी इत्यादी ताल धरून नाचू लागले. “house nigger” असल्या शिवाय शांतपणे राज्य करणे मुश्किल होय म्हणून त्याकाळच्या आसाराम बापू सारख्या व्यक्ती म्हणजे गांधी ह्यांना सरकारने प्रमोट केले. अहिंसावादी गांधी ह्यांनी प्रथम महायुद्धांत आणि नंतर द्वितीय महायुद्धांत भारतीय मुलांना सैन्यात मरायला पाठवून खाल्या नमकाचा फर्ज अदा केला.
पॉर्न पाहण्यासाठी लॅपटॉप वापरणाऱ्या मुलाचा लॅपटॉप चोराला तर त्याचे फक्त लॅपटॉप चे नुकसान होते पण कोडिंग करून पोटभरणाऱ्या माणसाचा लॅपटॉप चोरला तर त्याचे लॅपटॉप + बुडालेला रोजगार ह्या दोन्हीचे नुकसान होते. चोराला मात्र फक्त लॅपटॉप चा फायदा होता. त्या न्यायाने भारतीयांचे फक्त आर्थिक नुकसान नाही झाले तर भारतीयांचे जे पोटेन्शिअल होते त्याचे सुद्धा नुकसान झाले.
ब्रिटिश आणि नंतर त्यांचे कठपुतळी नेहरू ह्यांच्या मुले भारतीय लोक आज सुद्धा अतिशय tyrannical सरकार खाली जगत आहेत जिथे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सरकारी बांबूची परवानगी लागते. जिथे आज सुद्धा सरकारी लोक जाताना लाल दिव्याची गाडी वापरतात आणि सर्वसाधारणतः peasant लोकांना मान खाली घालून वाट करून द्यावी लागते. जिथे आर्मी अधिकार कवडीमोल किंमत देऊन उच्चभ्रू जागांत राहतात आणि आम्हा तुम्हाला अव्वाच्या सव्वा पैसे मोजून साधा फ्लॅट घ्यावा लागतो.
ऑफ टॉपिक : गांधी हत्या का केली गेली ? ह्यावर श्री एलस्ट ह्यांचे अतिशय सुदंर लेक्चर आहे.