साधना

Your Spiritual Journey

निळावंती आणि सूर्य स्पर्श – Nilavanti Book

निळावंती पुस्तकाची महती सर्वानाच ठाऊक आहे. अतिशय जुन्या काळातील हे पुस्तक असून ह्यांत एका अगम्य भाषेतील मंत्र आहेत आणि ह्या मंत्रातून आम्ही निसर्गाची शक्ती वापरून अनेक अतींद्रिय अश्या गोष्टी करू शकतो. संपूर्ण भारतांत ह्या पुस्तकांच्या फक्त ५-६ प्रति असून विविध लोक त्याचे संरक्षण करत आहेत. मोठे मोठे सिद्ध तांत्रिक आणि योगी सुद्धा ह्या पुस्तकाला स्पर्श करत नाहीत. निळावंती पुस्तकाची कथा आमच्या इतर संकेतस्थळांवर तसेच ऍप्प मध्ये उपलब्ध आहे.

सूर्यस्पर्श हि एक अगम्य योगिक सिद्धी आहे. असे म्हटले जाते कि ह्या सिद्धीचे मूळ निळावंती ग्रंथात दिले होते. बनारस येथील एक सिद्ध महापुरुषाने त्या विद्येला समजून घेतले. हि कथा भारतांतील प्रसिद्ध योगी श्री जग्गी वासुदेव ह्यांनी प्रसिद्ध केली आहे. तर सूर्यस्पर्श विद्येंत आरसा आणि सूर्याची किरणे वापरली जातात. सूर्य किरणात फक्त नैसर्गिक ऊर्जा असते असे नाही तर प्राणशक्ती सुद्धा असते. हि शक्ती वापरून सिद्ध माणूस, आरशांच्या आणि पाऱ्याच्या मदतीने मृत व्यक्तीत सुद्धा काही काळ प्राण फुंकू शकतात आणि खूप सिद्ध लोक मृत व्यक्तींना पुन्हा जीवनदान सुद्धा देऊ शकतात.

सद्गुरूंनी अशी कथा मागितली होती कि बनारस भागांत एक सिद्ध पुरुष राहत होता आणि सूर्य स्पर्शाच्या मदतीने तो मृत्य पक्षी किंवा छोटे मोठे जीव ह्यांना तो काही काळ पर्यंत जीवित ठेवत असे. आपल्या सिद्धीसाठी त्याने एक देवीची मूर्ती स्थापन केली होती आणि तिथे तो योगसाधना करायचा. तिथे एक मुस्लिम आक्रमकाचे शासन होते. त्याचा मुलगा मृत झाला. कुणी तरी ह्या मुस्लिम शासकाला ह्या सिद्ध व्यक्ती बद्दल सांगितले. त्याने अनेक सुवर्णमुद्रा देऊन आपल्या सरदाराला सिद्धा कडे पाठवले.

सिद्धाने मृत माणसाला जीवनदान देण्यास आपण असमर्थ आहोत असे सांगितले आणि कितीही सुवर्णमुद्रा दिल्या तरी आपण असा प्रयोग दरबारांत येऊन करू शकत नाही असे सरदाराला सांगितले. मृत व्यक्तीला इथे आपल्या देवीच्या पुढे आणले तर कदाचित मी प्रयत्न करू शकेन असे त्याने सांगितले.

सरदाराला हे सर्व थोतांड वाटले तसेच मूर्तिपूजा त्यांच्या दृष्टीने मोठे पाप होते. सरदाराने मूर्ती शक्तीनिशी उपटली आणि सिद्धाला कैद करून त्याने दरबारांत नेले. आपल्या देवीचा अपमान सिद्धाला असाह्य झाला आणि त्याने काहीही करण्यास नकार दिला आणि मुस्लिम आक्रमकाने त्याचा शिरच्छेद केला.

अशी कथा आहे पण सूर्यस्पर्श हि सिद्धी क्वचित मुख्य हिंदू शास्त्रांत सांगितली जाते. काही लोक ह्याचे मूळ निळावंती आणि त्याच्याशी संबंधित अगम्य शक्तींशी आहे असे मानतात.

निळावंती ग्रंथाबद्दल काहीही माहिती असल्यास किंवा तुमचे स्वतःचे अनुभव असल्यास इथे प्रतिक्रिया म्हणून द्यावी.

3 thoughts on “निळावंती आणि सूर्य स्पर्श – Nilavanti Book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version